"वंचित बहुजन आघाडी" च्या डफली बजाव आंदोलनास यश- राज्यांतर्गत आंतरजिल्हा ST बस सेवा सुरु करण्यास सरकारला भाग पाडले. - डॉ नितीन सोनवणे
बीड (प्रतिनिधी)दि.19 सामान्य माणसाची जीवनरेखा असलेल बस सेवा चालू करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात "वंचित बहुजन आघाडी" च्या वतीने.अॅड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात डफली बजाव आंदोलन करण्यात आले आणि सरकारला इशारा देण्यात आला की जर 15 ऑगस्ट पर्यंत याचा निर्णय न झाल्यास "वंचित बहुजन आघाडी" रस्त्यावर उतरेल. त्याचाच धसका घेऊन राज्यात बस सेवा सुरु करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यामध्ये भाजपा जवळ 105 आमदार असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसत नाही याउलट एकही आमदार नसताना सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारी "वंचित बहुजन आघाडी" ही सक्षम विरोधी पक्षाची उणीव भरून काढत आहे.
सामान्य माणसाच्या हिताचा नेहमी विचार करणारे अॅड. बाळासाहेब आंबेडकर आपणांस खूप खूप धन्यवाद.
Comments
Post a Comment