Posts

कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी - प्रकाश आंबेडकर आपत्तीग्रस्तांना 'वंचित'च्यावतीने अन्नधान्य, कपड्यांचे वाटप !

Image
रायगड, (प्रतिनिधी) दि.२३ -: निसर्ग वादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबाग, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. या ठिकाणी त्यांनी अनेक कुटुंबांना आज गरजेच्या वस्तूंची मदत केली. शिवाय येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गरजेच्या वस्तू, अन्न धान्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे.   'निसर्ग' वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मंडणगड तालुक्यात आले होते. सुपारी आंबा-काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच हजारो घरांचे छप्पर उडून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शाळा तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागात अद्यापही वीज प्रवाह सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.  कोकणात गुंठा पद्धत असून कोकण वगळ...

साकेत बचाव विरासत बचाव बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारा देशव्यापी धरणे आंदोलन संपन्न

Image
परळी (प्रतिनिधी) -: साकेत ( अयोध्या) येथे भारत सरकार व राम जन्म भूमी ट्रस्ट तर्फे लॉक डाऊन असताना ही मंदिर निर्मिती च्या नावाखाली उत्खनन करून प्राप्त बुद्ध अवशेष व वस्तू नष्ट करण्यात येत आहेत . त्या विरोधात बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क द्वारे दि 5 व 22 जून रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. परळी परिसरातील वाल्मिकी नगर,फुले नगर,अशोक नगर, शिवाजी नगर, नागसेन नगर, माधव बाग, मांडवा, व वडगाव येथील बौद्ध विहारात  महिला व युवकांनी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला. शेवटी तहसील दार यांच्या मार्फत मा राष्ट्रपती ना सविस्तर निवेदन देण्यात आले.सदरील 70 एकर जागेवर भारतीय पुरातत्व विभागा द्वारे उतख नंन करून वारसा लोकांना दाखवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन  करण्यात येईल. यावेळी विजय क्षीरसागर, सूर्यकांत इंगळे, कांतादेवी तुसाम,मीरा क्षिरसागर,केरुबाई वाव्हळे, शारदाताई कांबळे, कविता नरवाडे, कु. जागृति तुसाम, शांताबाई वैरागे, आदित्य तुसाम, नितीन पंडित,राहुल कसबे उपस्थित होते.

कोरोना योध्दा म्हणून पञकार शेख मुदस्सिर सन्मानित

Image
परळी (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सरकार एक्स्प्रेस न्युज नेटवर्क चे परली प्रतिनिधि शेख मुदस्सिर नसीर यांना जमियात उलमा ए महाराष्ट्र मौलाना महमूद मदनी चे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जमील अध्यक्ष यांना  हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन जमियात उलमा ए महाराष्ट्र मौलाना महमूद मदनी चे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जमील अध्यक्ष  यांनी    पञकार शेख मुदस्सिर नसीर  यांना कोरोना  योध्दा म्हणून   प्रशस्तीपत्र देऊ...

कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान, अकोला राज्यातील पहिली जिल्हा परिषद

Image
अकोला, (प्रतिनिधी)-: अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशी बिजी२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेला मान्यता देण्यात आली आहे. अशी योजना मंजूर करणारी अकोला जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव आहे. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेबाबत सूचना केल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषि अर्थव्यवस्था अडचणीत आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसांचे जीवनमान सर्व शेतीवरच अवलंबून असते. कितीही क्रांती झाली तरी पोटाला लागणारे अन्न जमिनीतून निर्माण होते. त्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करतो. मात्र समाजाचा व शासनाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट होत चालली आहे.   या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, या वर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अकोला जिल्हा परिषदेने अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे निश्‍चित केले आह...

सायं.दै.परळी बुलेटिन चे पत्रकार ब्रह्मानंद कांबळे यांना कोरोना योध्दा पुरस्कारांनी सन्मानित

Image
परळी वै.(प्रतिनिधी) :-  कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल पञकार ब्रह्मानंद कांबळे  यांचा  पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील पञकार , पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे पुरोगामी पञकार संघाचे  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी दै.परळी बुलेटिन प्रतिनिधी ब्रह्मानंद  कांबळे यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला  बीड जिल्हाच्या परळी तालूकातील प्रसिद्ध  पञकार  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल पत्रकार ब्रह्मानंद कांबळे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस अससोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास तांदळे यांना विधान परिषदेवर निवड करा-बाबासाहेब कुकडे

Image
परळी वै. (प्रतिनिधी) :- कोणत्याही समाज कार्यात अग्रेसर असलेले कैलास तांदळे यांना विधानपरिषदेवर निवग करावी अशी मागणी बाबासाहेब कुकडे यांनी केली आहे.          कैलास तांदळे हे गेल्या अनेक वर्षांपासून फार्मसिस् क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सतत सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात त्यांनी मेडिकल स्टोअर्स असो की फार्मसिस् सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आवाज उठवला आहे. विविध आंदोलनात सक्रिय सहभाग असता ते सर्व समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशिल राहतात. "उत्साह" शब्द म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायचे असेल तर कैलास यांचे कडे पहावे लागेल.मनुष्या चे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते हे यांना पाहिल्या लक्षात येते मागील कित्तेक वर्षा पासून कोणताही गाजावाजा न करता ते  फार्मसी फिल्ड करता काम करत आहेत,फार्मासिस्ट ने कोणतेही काम त्यांच्या कडे घेऊन गेल्यास ते होतेच, हा अनुभव आल्याने आपोआप फार्मासिस्ट हृदय सम्राट हा किताब त्यांना मिळाला. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल मध्ये/संबधित खात्यात/मंत्रालयात फार्मासिस्ट चे ...

प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, शिक्षक सुगंध गुट्टे यांचे निधन

Image
परळी (प्रतिनिधी) दि. 23 जून -: परळी  येथील ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक सुगंध अण्णासाहेब गुट्टे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील दहा ते बारा दिवसापासून पुणे येथील रुबी रुग्णालयांमध्ये ते उपचार घेत होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.      संत तुकाराम विद्यालय नागापूर कॅम्प येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत होते तसेच पत्रकार पत्रकारिता क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते त्यांच्या जाण्याने शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील पत्नी मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असा भरगच्च परिवार आहे त्यांच्या  जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी वजनात परिसरातील स्मशानभूमीमध्ये 23 जून ठीक सकाळी 11 वाजता होणार आहे असे गुट्टे परिवाराकडून सांगण्यात आले आहे . त्यांच्या दुःखात दक्ष न्युज परिवार सहभागी आहे.