साकेत बचाव विरासत बचाव बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारा देशव्यापी धरणे आंदोलन संपन्न


परळी (प्रतिनिधी) -: साकेत ( अयोध्या) येथे भारत सरकार व राम जन्म भूमी ट्रस्ट तर्फे लॉक डाऊन असताना ही मंदिर निर्मिती च्या नावाखाली उत्खनन करून प्राप्त बुद्ध अवशेष व वस्तू नष्ट करण्यात येत आहेत . त्या विरोधात बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क द्वारे दि 5 व 22 जून रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. परळी परिसरातील वाल्मिकी नगर,फुले नगर,अशोक नगर, शिवाजी नगर, नागसेन नगर, माधव बाग, मांडवा, व वडगाव येथील बौद्ध विहारात  महिला व युवकांनी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला. शेवटी तहसील दार यांच्या मार्फत मा राष्ट्रपती ना सविस्तर निवेदन देण्यात आले.सदरील 70 एकर जागेवर भारतीय पुरातत्व विभागा द्वारे उतख नंन करून वारसा लोकांना दाखवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन  करण्यात येईल. यावेळी विजय क्षीरसागर, सूर्यकांत इंगळे, कांतादेवी तुसाम,मीरा क्षिरसागर,केरुबाई वाव्हळे, शारदाताई कांबळे, कविता नरवाडे, कु. जागृति तुसाम, शांताबाई वैरागे, आदित्य तुसाम, नितीन पंडित,राहुल कसबे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला