कोरोना योध्दा म्हणून पञकार शेख मुदस्सिर सन्मानित
परळी (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सरकार एक्स्प्रेस न्युज नेटवर्क चे परली प्रतिनिधि शेख मुदस्सिर नसीर यांना जमियात उलमा ए महाराष्ट्र मौलाना महमूद मदनी चे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जमील अध्यक्ष यांना हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची दखल घेऊन जमियात उलमा ए महाराष्ट्र मौलाना महमूद मदनी चे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जमील अध्यक्ष यांनी पञकार शेख मुदस्सिर नसीर यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले
यावेळी सय्यद जमील अध्यक्ष, मौलाना शेख तैमूर मिल्ली, तौसीफ सय्यद, इकबाल भैय्या, फ़ैज़ सय्यद व दिगर उपस्थित होते
Comments
Post a Comment