परळीत पहिल्याच पावसात स्वच्छतेचे तीन-तेरा,तुंबलेल्या नाल्यांचे नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले पावसाचे पाणी....स्वच्छतेचा महिन्याचा 24 लाख खर्च कोणाच्या घशात ? प्रा पवन मुंडे



परळी (प्रतिनिधी) -: परळी नगरपालिकेने अस्वच्छतेचा कळस गाठला असून, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत,नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्याने पहिल्याच पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन ते लोकांच्या घरात व दुकानात घुसले आहे याला जवाबदार सर्वस्वी नगरपालिका प्रशासन आहे तरी नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी खरमरीत टीका भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी स्वछतेचे तीनतेरा वाजले असून जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे , भर मोंढ्यात टेलर लाईन च्या बाजूला चक्क रस्त्यावर मुतारी झाली आहे ,शहरात अनेक ठिकाणी बोगस नाल्या चे बांधकाम झाले असून त्यांचा उतार नेमका कोणत्या दिशेला आहे हे नगरपालिकेचा कोणताच कर्मचारी सांगू शकत नाही, मोंढा व शहरातील बहुतांशी भागात नाल्या तुंबल्याने कालच्या पावसाचे पाणी घरात व दुकानात घुसले असून या मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत,जागोजागी रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग उचलले जात नाहीत,नाथ रोडवरील सगळ्या नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत त्या बुजून गेल्याने नाल्या मध्ये पाणी तुंबून बसत आहे त्या मुळे गुरुकृपा नगर मधील लोकांच्या घरात पाणी घुसले तसेच रस्त्यावरील नाथ रोड वरील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत,संपुर्ण शहरात स्वछतेची यंत्रणा अपूर्ण पडतांना दिसत आहे आहे मग महिन्याला स्वच्छतेपोटी होणारा 24 लाख रुपये खर्च कोणाच्या घशात जात आहे अशी टीका भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली असून नगरपालिकेने मान्सून पूर्व स्वछतेची कामे त्वरित चांगल्या पद्धतीने करावीत अशी मागणी प्रा मुंडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला