जि प प्रा शा संगम शाळेच्या यशाची परंपरा कायम चि.ओमकार विठ्ठल गारुडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड
परळी वै.(प्रतिनिधी) -: जि.प.प्रा.शा संगम शाळेची गत वर्षीपासून नवोदय विद्यालय साठी विद्यार्थी निवड होण्याची परंपरा कायम असून या वर्षीही चि ओमकार गारुडे याची नवोदय विद्यालय बीड निवड झाली आहे.
गतवर्षीही या शाळेच्या कुमारी दिव्या चव्हाण या विद्यार्थिनीची नवोदय साठी निवड झाली होती.
दरम्यान ओमकार गारुडे यांच्या निवडीचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले यावेळी चि.ओमकार, त्याचे आई-वडील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंच सौ वत्सलाबाई कोकाटे ,शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे, शिक्षणप्रेमी हभप रामेश्वर महाराज कोकाटे,शिक्षणप्रेमी युनूस बेग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहनराव नागरगोजे, वैजनाथराव म्हस्के यांच्यासह शिक्षक सर्वश्री सखाराम किटाळे, महादेव गित्ते,सचिन फड, अमोल खिंडरे आदी उपस्थित होते यावेळी हभप रामेश्वर महाराज कोकाटे व मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्याकडन प्रत्येकी 1 हजार रुपयाचे बक्षीसही ओमकारला देण्यात आले. या निवडीबद्दल ओमकार व जि प प्रा शा संगम शाळेच्या मु अ व सर्व शिक्षकांचे अभिनंदन परळी तालुका गट विकास अधिकारी मा संजय केंद्रे , गटशिक्षणाधिकारी मा गणेश गिरी ,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काळे मॅडम, अन्सारी मॅडम , नूतन परळी केंद्रप्रमुख यादव पल्लेवाड, केंद्रीय मुख्याध्यापक मोहन कांबळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment