मोटारसायकलची चोरी करतांना सी.सी.टि.व्हित चोर झाला कैद.
परळी(प्रतिनिधी) -: तालुक्यातील टोकवाडी येथील एकाची मोटारसायकल परळीच्या बाजार समिती येथुन चोरीला गेली असुन
चोर मात्र सी.सी.टि.व्हित कैद झाला अाहे
परळी बाजार समिती येथे टोकवाडी येथील अंगद केशव मुंडे यांची एम.एच.44एच.6327या क्रमांकाची मोटार सायकल आज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान चोरीला गेली आहे मात्र चोर मोटारसायकल घेवुन जातांना बाजार समितीच्या सी.सी.टि.व्ही च्या कँमेरात कैद झाला आहे.सदर मोटार सायकल चोरीची तक्रार अंगद मुंडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली असुन पोलीस चोराचा तपास करीत आहे.
Comments
Post a Comment