पत्रकार महादेव गित्ते कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित
परळी (प्रतिनीधी)-: परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांनी कोरोना लॉकडाऊन काळात केलेल्या वार्तांकनाच्या कार्याची दखल घेवुन सावंतवाडी च्या वतिने कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे.
रूपेश परशुराम परब अध्यक्ष असलेल्या सिंधुदिशा, शैक्षणिक व सामाजिक संस्था, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग व सचिन फाळणे संस्थापक असलेल्या जनकल्याण सेवा फाउंडेशन, ठाणे यांच्या वतीने लॉकडाऊन काळात कार्य केलेल्या व्यक्तींचा कोरोनो योद्धा म्हणुन सन्मानपत्र देऊन
सन्मान करण्यात आला यात परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांनी केलेल्या पत्रकार, पर्यावरण,प्राणीमात्रांचे संरक्षण व मदतकार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आले.कोरोना योद्धा म्हणुन महादेव गित्ते यांचा सन्मान झाल्याबद्दल सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment