ना.धनंजय मुंडे ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल
ना.धनंजय मुंडे ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल
बीड (प्रतिनिधी)-: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंडे व त्यांच्या स्वीय सहायकामध्ये कुठलीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून 'मीडियाला देण्यात आली.
आज पहाटे ना.धनंजय मुंडे, त्यांचे दोन स्वीय सहायक, मुंबई व बीडमधील वाहनचालक व मुंबईतील कूक इतक्या लोकांचे स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
ना.मुंडे बीडचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या संपर्कात अनेकजण आलेले आहेत. त्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाने त्यातील काही जणांचे स्वॅब देखील घेतल्याची माहिती आहे.
पालकमंत्र्यांनी 8 जून रोजी अंबाजोगाईत कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेचे उद्घघाटन केलेले होते. त्यामुळे प्रशासन देखील हादरून गेलेले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मागील चार दिवसात जे जे पालकमंत्री त्यांचे स्वीय सहायक किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून 28 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे, असे अवाहन केले आहे.
Comments
Post a Comment