मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील नाथ्रा ते इंजेगाव फाटा रस्त्याचे काम आठ महिन्यापासून रखडले ; तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे - रमेश मुंडे
परळी वै.(प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे नाथ्रा येथील नाथ्रा ते इंजेगाव फाटा या मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यापासून रखडले आहे. संबधीत कंत्राटदार दाराने खड्डीकरण करून जे गायब झाले आहे ते आजातागयत रखडलेले कारपेटचे काम आठ महिन्यापासून रखडले आहे. तरी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन रखडलेले काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाथ्रा येथील रमेश मुंडे (महाराज) यांनी दिला आहे.
परळी तालुक्यातील मौजे नाथ्रा ते इंजेगाव फाटा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम रखडल्यामुळे खडीकरण करण्यात आले होते ते आता खडी उकडून पडल्यामुळे ला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याचा फटका गावातील नागरिकांना सोसासावा लागत आहे. तसेच शेतकरी आपल्या बैलगाडी घेऊन जात असतांना बैलाच्या पायाला या उकडून पडलेल्या खडीमुळे दुखापत होत आहे. याचा त्रास मुक्या जनावरांना देखील होत आहे. रस्ताच्या कडेला थांबलेल्या ग्रामस्थांना चार चाकी ते दुचाकी जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगात असतांना खड्डी उडून लागत आहे तर अनेकांचे डोके फुटले तसेच दुखापत झाल्या आहेत. त्यामुळे रखडले काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील नाथ्रा ते इंजेगाव फाटा दरम्यान सुमारे 3.5 किमी अंतरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून फक्त खडीकरण करून 8 महिन्यापासून कंत्राटदार गायब झाले आहेत. डांबरीकरण कारपेटचे लियीर न टाकल्यामुळे खड्डीकरण उकडून पडत आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडले आहेत. या कामाचे नाव रामा 235 ते नाथ्रा अंदाजीत 2 कोटी ,29.लक्ष रूपये खर्च करण्यात येणार आहेत. काम सुरू करण्याची दि.06.10.2018 काम पुर्णत्वास कलावधी दि.05.10.2019 काम पुर्णत्वानंतर पाच वर्षे देखभाल करावयाची आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याने निकृष्ट दर्जाजे काम झाले असून गुत्तेदार आणि अधिकारी व या कामाचे अभियंता यांनी संगनमत करून शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे. आठ महिन्यापासून रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे रखडलेले काम अंदाजपत्रकानुसार करावे अशी मागणी रमेश मुंडे (महाराज) यांनी केली आहे.
Comments
Post a Comment