फेरफार पुराव्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये - निळकंठ चाटे



परळी वै.(प्रतिनिधी) :- पीक कर्ज मागणीसाठी बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून फेरफार नक्कल ची मागणी करून अडवणूक केली जात आहे अश्या प्रकारे शेतकरयांची अडवणूक करू नये व पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे  अशी मागणी भाजयुमोचे निळकंठ चाटे यांनी केली आहे.  
                   आगामी खरीप हंगामसाठी जिल्हाभरातून शेतकऱ्याकडून पीककर्जाची मागणी होत असून या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत आणि मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकरयांनी गर्दी केली आहे,मात्र बँकांकडून शेतकऱ्यांची फेरफार आणि इतर कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात आहे . परिणामी फेरफार ची नक्कल  काढण्यासाठी शेतकरयांची तहसील कार्यालयात गर्दी होत असून यामुळे कोरोना  आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुकारण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिन्ग चे पालन केले जात नसून यामुळे कोरोना आजाराचा प्रसार  नाकारता येत नाही . बँकेत येणारा एखादा खातेदार ग्राहक हा जुनाच असेल तर त्यांचे सर्व कागदपत्र दस्तावेज हे आपलया शाखेमध्ये उपल्बध आहेत तसेच त्यांच्या अद्यावत नावा बाबत खातर जमा करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळांचा  उपयोग करण्यात यावा तसेच यामुळे ७/१२ वरील नोंदीतील बदलांची खात्री करता येते फेरफार हि नक्कल अनेक वर्षांपूर्वीची जुनीच असल्याने त्यामुळे गतवर्षी कर्जदाराने दाखल केलेल्या फेरफारात कोणताही बदल होत नसल्याने म्हणून बँकेत येणाऱ्या कोणत्याही जुन्या खातेदाराकडून फेरफार नक्कल ची मागणी करण्यात येऊ नये व शेतकरयांची अडवणूक करू नये असे भाजपाचे निळकंठ चाटे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला