परळी तालुक्यात दाऊतपुर शिवारातील खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू
परळी : (प्रतिनिधी) खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसह तीच्या लहान बहीण व भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली. एकाच घरातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे मजूर कुटुंब नांदेड जिल्ह्यातील वसुरणी येथील आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
परळी तालुक्यातील दाऊतपुर ते औष्णिक विद्युत केंद्र रोडवर खडीमशिनजवळ खदान आहे. या खदानीत पाणी साठलेले आहे. सोमवारी सकाळी कपडे धुण्यासाठी याच परिसरात राहणाऱ्या दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील एक 15 वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण व भाऊही होता. या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना समजताच नातेवाईकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने एकच आक्रोश त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसह तीच्या लहान बहीण व भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली. एकाच घरातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे मजूर कुटुंब नांदेड जिल्ह्यातील वसुरणी येथील आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
परळी तालुक्यातील दाऊतपुर ते औष्णिक विद्युत केंद्र रोडवर खडीमशिनजवळ खदान आहे. या खदानीत पाणी साठलेले आहे. सोमवारी सकाळी कपडे धुण्यासाठी याच परिसरात राहणाऱ्या दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील एक 15 वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण व भाऊही होता. या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना समजताच नातेवाईकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने एकच आक्रोश त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Comments
Post a Comment