परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त करणार पॅडल हॅण्डफ्री डिस्पेन्सर चे वाटप- बाजीराव धर्माधिकारी


परळी वै.(प्रतिनिधी)-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दि.१० जुन रोजी परळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी पॅडल हॅण्डफ्री डिस्पेन्सर चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १०जुनला वर्धापनदिन साजरा करण्यात येतो.या निमित्ताने दरवर्षी परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवते.८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे खा. शरद पवार यांचे धोरण असुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्यक्षात ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सुत्र घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो.
       जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा वकोरोना प्रतिबंधक मोहीमेत योगदान देणारा उपक्रम राबविला जाणार आहे.10 तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने परळी शहरातील न्यायालय, तहसील,पोलीस स्टेशन, नगर पालिका,कृषी कार्यालय,sbi बँक,महाराष्ट्र बँक, पंचायत समिती,यासह इतर गर्दीच्या ठिकाणी पॅडल हँडफ्रि डिस्पेन्सर वाटप करण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला