पालकमंत्री जिल्हा रुग्णालयात उपचार घेतील का ? -- डॅा.नितिन सोनवणे
बीड (प्रतिनिधी )-: आज सकाळी सर्व माध्यमांवर बीडचे पालकमंत्री यांच्या कोरोणा पॉझिटीव्ह असल्याच्या बातम्या दिसत होत्या. बातमी बघून धक्का बसला आज जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आणि जिल्हा रुग्णालयात प्रचंड सुविधांचा तुटवडा आहे .त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयातच आपली ट्रीटमेंट करून घ्यावी. जेणेकरून जिल्ह्यातील जनतेचा विश्वास जिल्हा रुग्णालयात बसेल व त्या ठिकाणी ज्या काही कमतरता आहेत. त्या तात्काळ पूर्ण होतील. डाॅ.कोण कधी येतो,पाणी, जेवण,औषध उपचार व्यवस्थित आहे का? हे पण यानिमित्त माहिती पडेल. त्याचबरोबर कशा पद्धतीने जिल्हा रुग्णालयातील कारभार चालतो. हे आपणास माहिती मिळेल. सध्या जिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे आहे. गरीबांना नाहाक खाजगी रुग्णालयाचा अधार घ्यावा लागतो.
चौकट
धनंजय मुंडे हे चांगले उपक्रम राबवितात
ज्याप्रमाणे स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी covid-19 चाचणीची प्रयोगशाळा उद्घाटन केलं होतं. अशा अनेक चांगल्या उपक्रमात ते सहभागी होतात. त्यांनी जर आपली ट्रीटमेंट जिल्हा रुग्णालयात घेतली, तर अनेक सुविधा या ठिकाणी कार्यरत होतील.अशी माफक अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
आदर्श महाराष्ट्र घेईल.
गोरगरीब सर्वसामान्य लोक पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आपली ट्रीटमेंट घेतात बघ नेतेमंडळी का? या ठिकाणी उपचार घेत नाही. हाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पालकमंत्री यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याला कोरोना पासून बचाव करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.तो कशा खर्च केला जातो. तो याठिकाणी पाहायला मिळेल.
चौकट
डॉ.नितीन सोनवणे वंचित बहुजन आघाडी, बीड.
पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयात ट्रीटमेंट घेऊन एक आदर्श निर्माण करावा .जेणेकरून जिल्हा रुग्णालयावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसेल व विश्वासार्हता वाढेल .ज्या काही कमतरता आहेत. त्या मिळतील.
Comments
Post a Comment