तीनच पावसात अशोक नगर, नागरिकांचे बेहाल. न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य
परळी (प्रतिनिधी) -: परळी येथे दोन-तीन दिवसापासून पाऊस पडत असून अशोक नगर भागात रोडवर पावसाचे पाणी साचले आहे , रस्ते आणि नाल्यांना नदीचे स्वरूप आले आहे यामुळे रस्त्यावर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. आहे भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून रोड व नाल्यांची समस्या , सामोर जावे लागत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे भागात पाण्याचा ढव चिखल कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. भागातील नागरिकांना कामाला जाता व येता वेळी पाण्याच्या ढवातून व चिखलातून येणे-जाणे करावे लागत आहे. तसेच भागातील महिलांना पाणी भरण्यासाठी व सार्वजनिक शौचाल्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशोक नगर भागातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परळी नगरपरिषदेने संबंधित
अधिकाराने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी अशोक नगर येथील नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment