खा.शरद पवार यांच्यावर टिका करण्याची पडळकरांची लायकी नाही –चंदुलाल बियाणी


परळी (प्रतिनिधी) -: वयाच्या ८० व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार तरूणालाही लाजवतील एवढ्या उमेदीने काम करीत असून, त्यांच्या राजकीय उंचीची बरोबरी करण्याची किंचितही पात्रता आ.गोपीचंद पडळकर यांची नाही अशी जळजळीत टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न.प.सदस्य, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.
खा.शरद पवार यांच्यावर आ.पडळकर यांनी केलेल्या टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी खरपुस समाचार घेतला. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर पडळकर भाजपकडून आमदार झाले. नव्यानेच आमदार झाल्याने त्यांचा तोल गेला असून, तोंडही चांगलेच फुटले आहे. खा.शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी व सार्वजनिक प्रश्नांवर आपले उभे आयुष्य पणाला लावले आहे. आजही राज्यात कोठोही संकट आले तर शरद पवार आणि शरद पवारच घटनास्थळी धाव घेतात. राज्याच्या राजकारण आणि समाजकारणाचा पडळकरांना अभ्यास नसल्याने त्यांनी टिका करण्यापेक्षा शरद पवार यांच्या नेतृत्वाचा मनापासून अभ्यास करावा आणि मगच टिका करावी असा सणसणीत सल्लाही बियाणी यांनी दिला आहे. पडळकरांनी केलेल्या टिकेचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही निषेध करीत असल्याचेही बियाणी यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला