कु. निकीता जगतकर आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याचे धनंजय मुंडेंचे पोलिसांना निर्देश जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून केले सांत्वन, आर्थिक मदतीसाठी समाज कल्याण विभागालाही दिले निर्देश


परळी (प्रतिनिधी) - : कु. निकिता जगतकरच्या  आत्महत्या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांना तातडीने आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समाज कल्याण विभागामार्फत तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचेही निर्देश ना. मुंडे यांनी दिले आहेत.

ना. मुंडे हे होम क्वारंटाईन असतानाही या प्रकरणाची दखल घेत त्यांचे सहकारी प्रतिनिधी डॉ. विनोद जगतकर यांच्या माध्यमातून ना. मुंडेंनी जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून संवाद साधत सांत्वन केले.

यावेळी ना. मुंडे यांनी आपण जगतकर कुटुंबियांच्या पाठीशी असून कु. निकिताच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी असे निर्देश बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील दु:खीत जगतकर कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत जिल्हा समाज कल्याण विभागालाही निर्देश दिले आहेत. निकीताच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निकीताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर