अजय मुंडे यांनी सूचना देताच अधिकारी स्थळ पाहणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ; बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीचे धाबे दणाणले ! सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीत मोठी वाढ ; लवकरच तालुका बियाणे तक्रार निवारण समिती वरिष्ठांकडे अहवाल करणार सादर



परळी वै.(प्रतिनिधी) दि.१९ - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे मुंबई येथे उपचार घेत असल्याने बंधू जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे हे परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच पंचायत समितीच्या दालनात तालुकस्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार तालुका कृषी अधिकारी यांनी विविध पथकांची निर्मिती करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेरलेले बियाणे उगवले नसल्याची स्थळ पाहणी केली. ही समिती लवकरच वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याने बांधीत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली आहे. लाखो रु खर्च करून विविध नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले पण ते उगवले नसल्याने हजारो हेक्टर वरील पेरणी क्षेत्र वाया गेले आहे, याच बरोबर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करून आर्थिक लूट केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केला आहे.

परळी तालुक्यातील १७ गावातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून  विविध पथका मार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी तालूका कृषी अधिकारी सोनवणे यांच्या पथकाने मौजे मांडवा येथे पाहणी केली तर दुसरे पथक प्रमुख एस.एस. गादेकर यांच्या पथकाने कासारवाडी येथे सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी मांडवा ग्राम. प. सदस्य मोहन साखरे, कसारवाडीचे बंडू गुट्टे, विकास फड, शेतकरी राम दराडे, मधुकर तिडके, बाबूराव चाटे, भाऊसाहेब मुंडे, मधुकर साखरे, बाळू फड, वैजनाथ आघाव, बाबू दराडे, राजेभाऊ कराड, प्रमेश्वर साखरे, मारोती मुंडे, कृषी मंडळ अधिकारी मोरे के.टी. कृषी सहाय्यक तिडके पि.डी.सावळे, कृषी विस्तार अधिकारी एस. एल. कांदे, कृषी सहाय्यक एस.एस. गव्हाणे, एस. आर. जायभाये, के.वाय. वाघमारे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला