जेष्ठ सामाजिक नेते भानुदास देवरवाडे "रामचंद्रजी इंगळे समाजसेवा पुरस्काराने" सन्मानित


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- येथील आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठ आधारस्तंभ तथा माजी जि. प.सदस्य बीड  कालकथित मा. रामचंद्र इंगळे (आप्पा) भारजकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा  मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार 
ज्येष्ठ सामाजिक नेते
 मा.भानुदास  नामदेव  देवरवाडे ,(देवळा)यांना  मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह देऊन  रविवार दि.28 जुन 2020 रोजी  रामचंद्रजी  इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव बालासाहेब इंगळे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश इंगोले,आयु.केवळबाई इंगळे, माजी तहसीलदार नामदेवराव इंगळे,जयश्री शिररसाट, राजेंद्र इंगळे,ब्रिजेश इंगळे ,डॉ. भारती इंगळे ,स्वीतम इंगळे,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्राचे शब्दांकन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी केले.
हा पुरस्कार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील  सामाजिक योगदान  असणाऱ्या,  निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तीस  व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान ,अंबाजोगाई जि.बीड यांनी 2019 पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे.
शासकीय नियमांचे पालन करून सदरील पुरस्कार कालकथीत रामचंद्र इंगळे यांच्या
 द्वितीय स्मृती दिनानिमित्त  अप्पांचे  सहकारी  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भानुदास नामदेव देवरवाडे,(देवळा) यांना प्रदान करण्यात  आला.
 स्मृतीदिन विधी बौद्धाचार्य युवराज होके यांनी संपन्न केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब इंगळेसर, सूत्रसंचालन प्रा. राजाभाऊ होके व आभार प्रदर्शन प्रा. कालिदास सुरवसे यांनी केले.या पुरस्कार सोहळ्यास बाबुराव कांबळे,आचार्य गुरुजी,अण्णा जाधव, समुद्रे गुरुजी, मुकुंद भागवत, नागोराव भागवत, दिलीप साठे,प्रा. बुद्धाजी खरात,प्रा. राजाभाऊ होके,रोहन इंगळे,भूषण इंगळे, विजय मस्के, बुद्धकरण जोगदंड, जीवन घाडगे, समाधान धिवार, भुजंग सूर्यवंशी, अभिजीत पवार,प्रशांत आचार्य,चंद्रकांत इंगळे,सुशील इंगळे व रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर