मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप


परळी दि १४ ( प्रतिनिधी ):- मनसे अध्यक्ष तथा हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित आज  महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्हा सचिव रवी नेमाने यांच्या वतीने परळी वैजनाथ मनसे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.                       ‌‌    सध्या राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. कोरोना व्हायरसचा समूळ नायनाट करण्यासाठी बीड जिल्ह्यातील प्रशासकीय, पोलीस प्रशासन तथा आरोग्य प्रशासन चे कर्मचारी - अधिकारी प्रत्यक्षात फिल्डवर येऊन दिवसरात्र काम करीत आहेत. तेव्हा मनसेचे अध्यक्ष तथा हिंदूजननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही इतर खर्च न करता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र मेहनत करीत आहेत अशा परळी शहरातील उपजिल्हा रुग्णालय, परळी शहर, संभाजी नगर व ग्रामीण पोलीस स्टेशन आदी ठिकाणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मनसे परळी वैजनाथ च्या वतीने सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळस्कर, तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, विद्यार्थी शहराध्यक्ष हनुमंत सातपुते, उपाध्यक्ष महेश शिवगण, सुमित कलशेट्टी, प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे, विठ्ठल जिज्मेवाढ, श्रीहरी दहिफळे, संतोष कचरे आदी मनसेचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला