परळी ते बीड रोडवरील पुलाच्या संरक्षण कठडे यांची दुरुस्ती करावी- गौतम साळवे


परळी वै.(प्रतिनिधी) :- परळी शहरातील इटके काँनर रोडवरील परळी ते बीड रोडवरील पुलाचे संरक्षण कठडे तुटल्यामुळे अपघातस धोका निर्माण झाला आहे. या रोडवरील पुलाच्या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गौतम साळवे यांनी केली आहे. 
           याबाबत माहिती अशी की, परळी ते बीड रोडवरील पुल हा अत्यंत अरूंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्रीतील अधिकारी व कर्मचारी तसेच अनेक गावातील नागरिक याच रस्त्यावर येजा करता त्यामुळे या पुलावरील पडलेल्या कठड्यामुळे एखादे भरधाव वेगाने आलेले वाहन संरक्षण नसल्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे तुटले आहेत. याठिकाणी झाडेझुडपे वाढल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून परळी ते बीड रोडवरील पुलांच्या संरक्षण कठड्यांची तात्काळ दुरूस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गौतम साळवे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला