सावधान! सुशांतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल कराल तर…
मुंबई (प्रतिनिधी) –: अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने विरोध दर्शवला आहे. तसेच, यावर महाराष्ट्र सायबर सेलने विरोध दर्शवला आहे. हे फोटो कुठेही व्हायरल कराल तर कायदेशीर कारवाई करू असा इशाला त्यांनी दिला
Comments
Post a Comment