"साकेत (अयोध्या ) येथील पुरातत्व बुद्ध वारसा जपण्यासाठी राष्ट्रपतीना निवेदन सादर"
परळी (प्रतिनिधी) -: बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क, या संघटनेच्या व इतर संघटनाच्या द्वारे आज दि 9 जून रोजी मा तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. साकेत ( अयोध्या) येथे लॉक डाउन असताना उत्खननात सापडलेले बुद्ध अवशेष विद्यमान केंद्र व योगी सरकार नष्ट करीत आहे .या पुढें ही ही कार्य वाही थांबविली नाही तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जनमत व जनआंदोलन निर्माण करून प्रश्न सोडविण्यात येईल. यावेळी बिन परळी शाखेचे प्रमुख प्रकाशशिंग तुसाम ,प्रा. चिंतामणी खंडागळे , प्रा . विलास रोडे , बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे, , प्रा. आर जे खरात , मराठा सेवा संघाचे प्रा .एम .एल.देशमुख बामसेफचे प्रा .जी आर .नरवाडे , राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या मिरा क्षीरसागर महादू मस्के,विजय क्षीरसागर, मौर्य क्रांती संघटन चे अशोक साखरे, कविता नरवाडे, जोगदंड ईत्यादी कार्यकर्ते हजर होते
Comments
Post a Comment