वृक्ष फांद्या छाटणीच्या माध्यमातून मौजे लिंबुटा येथे "सादग्राम"च्या कामांना प्रारंभ
परळी,दि.२१( प्रतिनिधी )-: तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे वृक्ष फांद्या छाटणीच्या माध्यमातून रविवार, दि २१ जून रोजी सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा या समितीच्या गावातील कामांना प्ररंभ करण्यात आला. झाडांच्या फांद्या छाटणी,आवश्यक त्या झाडांना लाकडांचा आधार देणे,आळे व्यवस्थित करणे,बाजूजे तृण काढणे आदी कामे आज करण्यात आली.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० पासून गावातील शैक्षणिक, ग्रामस्वच्छता,आदी कामे थांबवली होती.
मागील वर्षी जुलै २०१९ मध्ये ग्रामपंचायत व सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा च्या मर्गदर्शनाखाली गावातील मुख्यरस्त्यावर पिंपळ,वड ,गुलमोहर,चिंच,आवळा,लिंब,जांभळ, करंज आदी देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतच्या सहकार्याने सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती पदाधिकारी व काही ग्रामस्थांनी पुरेपूर काळजी घेऊन या वृक्षरोपांचे उत्कृष्टपणे संवर्धन केले आहे.आज या रोपांचे वृक्षात रूपांतर झालेले आहे.
सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे अध्यक्ष विश्वनाथ(आबा )मुंडे,उपाध्यक्ष विश्वांभर दोडके ,डी.बी.मुंडे सर ,सचिव व ग्रा.पं.सदस्य प्रसाद कराड,सल्लागार रामदास (नाना) दिवटे,सदस्य व ग्रा.पं. सदस्य बालाजी बनसोडे,सहसचिव इंद्रमोहन मुंडे,प्रसिध्दी प्रमुख मनोज रामराव मुंडे,सदस्य मंचक रामकृष्ण मुंडे, बळीराम सोमेश्वर मुंडे,ज्ञानेश्वर गित्ते,रमेश महारूद्र मुंडे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुंडे आणि झाडांची रस्त्यावरून जाता-येता सतत काळजी घेणारे ज्येष्ठ नागरिक दगडू जयवंतराव मुंडे,सिध्देश्वर जयराम मुंडे,रावसाहेब बनसोडे आदींनी आजच्या श्रमदानात आपले योगदान दिले.
Comments
Post a Comment