सफाई कामगारांना जयदत्त अण्णा न्याय दया - भाई गौतम आगळे
बीड (प्रतिनिधी)-: नगर परिषदेने कंत्राटी सफाई कामगारांचे आक्टोबंर, नोव्हेबंर २०१९ या दोन महिन्याचे त्यांच्या हक्काचे वेतन अध्यापही दिले नसून हा सफाई कामगारांवर अन्याय आहे. त्यांचे दोन महिन्याचे थकीत वेतन किमान वेतना प्रमाने देण्याचे निर्देश संबधितांना देवून वंचित कामगारांना न्याय दयावा अशी विनंती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे / सोशल मिडीया द्वारे केले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीड नगर परिषद आपल्या कुशल नेत्रत्वाखाली प्रगती पथावर आहे. नगर परिषद आस्थापनेत कंत्राटी सफाई कामगार २०० कार्यरत आहेत. मागील वर्षी त्यांनी त्यांच्या हक्काचे शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन मिळावे या करीता आंदोलन केले होते. पंरतू यातील फक्त ५० सफाई कामगारांना किमान वेतना प्रमाने वेतन न देता कमी दराने वेतन अदा केले आहे. उर्वरित १५० कामगारांना वेतन अदयाप दिले नसून उलट द्वेश भावनेने त्यांना अयोग्य / व बे-कायदेशीर रित्या कामावरुन कमी केले आहे. हा आपल्या कुशल नेत्रत्वाखाली कार्यरत नगर अध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांवर अन्याय केला आहे. सध्या कोरोना च्या महामारी मुळे संपूर्ण अर्थ व्यवस्था ढासली आहे. या मुळे सफाई कामगार आर्थीक नुकसानीत चाचपडत आहे. नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या हककाचे किमान वेतन नाकरले, राज्यात आणी बीड जिल्हयात बीड शहर वगळून सफाई कामगारांचे त्यांच्या कामाचे कौतुक करुन स्वागत करण्यात येत आहे. कारण सर्व जनता कोरोनाच्चा भितीने घरात बसून आहे. पंरतू सफाई कामगांर शहर स्वच्छ करत आहै. त्या मुळे बीड च्या सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन तात्काळ देवून पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी रोजंदारी मजदुर सेनेचे केन्द्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर, विभागीय आयुक्त (महसूल) औरंगाबाद, जिल्हाअधिकारी बीड यांच्याकडे ऎका निवेदनाद्वारे केल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
Comments
Post a Comment