पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड - १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन


बीड, (प्रतिनिधी) दि. ०७ :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण होत असून उद्या सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पालन करुन सदर कार्यक्रम  साधेपणाने करण्यात येणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड - १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेस आवश्यक सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून उद्या प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या संचालिका तथा मुख्याधिकारी मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी स्वाराती येथील या प्रयोगशाळेस मान्यता दिली असून कोविड - १९ चाचणी सुरू करण्यास अनुमती दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला