परळी वै.(प्रतिनिधी) -: लॉकडाऊन मध्ये वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, येथील संवर्धन केलेली जवळपास दोन लक्ष झाडे हिरवाईने बहरली. वन व समाजिक वनीकरण विभागाच्यावतीने परळी व परीसरात वसंतनगर, कन्हेरवाडी, रेल्वे स्टेशन येथील डेन्स फॉरेस्ट तसेच आनंदधाम व मालेवाडी परीसरासह जवळपास दोन लक्ष झाडांची लागवड व संवर्धन केल्याने उजाड माळरान हिरवाईने बहरले असून देशी विदेशी प्रजातींच्या वृक्षवल्लीमुळे हे डोंगरमाथे पर्यटन स्थळ बनत आहेत. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर शासकिय योजना फलदायी होते. प्रादेशिक वनीकरण व सामाजिक वनीकरण विभागाच्या परळी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची योजना हाती घेतली. डोंगरमाथ्यावरील दगडगोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमिनीवर आतापर्यंत फक्त पावसाळ्यात खुरटे गवत उगवायचे त्या माळरानावर वृक्षलागवड योजनेतून वसंतनगर,कन्हेरवाडी,रेवली,व परळी रेल्वे स्टेशन याठिकाणी हेक्टरवर 30 हजार झाडांची लागवड करीत संगोपन केल्याने हे डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत. तालुक्यात वनविभागाची शेकडो हेक्टर जमिन आहे.दगडगोट्यांनी व्यापलेल्या या खडकाळ जमिनीवर फक्त पावसाळ्यात गव...
Comments
Post a Comment