भिमनगर येथील स्मशानभुमी रोडवर मुरूम टाकण्यात यावा. बालासाहेब जगतकर
परळी (प्रतिनिधी)-: भिमनगर येथील स्मशान भुमि रोडवर मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सध्या पावसाळ्याचे दिवस असुन मयत झालेल्या व्यक्तिचे अंतविधी करण्यासाठी जाण्यासाठी खुप तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे व अंतविधी ला येणार्या महिलांना ही खुप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे कारण काळरात्री मंदिर ते स्मशान भुमीच्या रोडवर खुप मोठे खड्डे होवुन यात पावसाचे पाणी साचलयामुळे जाताना व येताना खुप तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे या रोडवर लवकरात लवकर मुरूम टाकण्यात यावा अन्यथा नाईलाजाने उपोषणाला बसावे लागेल असे साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर व युवकनेते मा.विजयकुमार हजारे यांनी पत्रकाद्वारे केले असुन परळी नगरपालिकेला लेखी निवेदन दिले आहे.
Comments
Post a Comment