नागरिकांनी वारंवार मागणी व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करूनही हिंदनगर भागात अनाधिकृत दारू दुकान सुरूच तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा - राम वाघमारे
परळी (प्रतिनिधी)-: हिंद नगर भागात खानावलीचे 25 दुकानें आहेत सदरील दुकानदार कडे अन्नभेसळ ,शाॅप अॅकट लायसेन्स नाहीत यांचा बसून दारू पिण्याचे परवानगी,देशी विदेशी दारू अनाधिकृत पणे विक्री करतात पाणी पाऊच प्लास्टिकच्या गलास दारू पितात
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील मध्यवर्ती नागरी वस्ती असलेल्या हिंदनगर भागात दारू विक्रीच्या दुकानामुळे व मद्यपींमुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबत या भागातील नागरिकांनी वारंवार नेते, प्रशासन, प्रसार माध्यमे या माध्यमातून या भागातील दारू दुकाने बंद करावीत अशी मागणी केलेली आहे. शेवटी या भागातील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. परंतू लेखी आश्वासनाशिवाय कोणतीही कार्यवाही झाली नसून दारू दुकानांमुळे या भागातील नागरिकांची परवड अद्यापही सुरूच आहे.
परळी शहरात हिंदनगर परिसरात अनाधिकृत दारूचे दुकान बंद करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी व गिरीष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपोषणाला आज 6 जानेवारीला केले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या दुकानांवर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांचा त्रास दुर करू असे लेखी आश्वासन देण्यात आले. उपोषण करूनही या दुकानांवर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसून उघडपणाने या भागात दारू विक्री व मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याचे दिसत आहे. परळी शहरातील हिंदनगर भागात असलेल्या अनाधिकृत दारूच्या दुकानामुळे व येथे येणाऱ्या मद्यपी लोकांमुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला नेहमी तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर अनेकवेळा प्रशासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना नागरिकांनी निवेदन जिल्हा अधिकारी साहेब बीड पोलीस अधीक्षक साहेब बीड ,उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साहेब परळी अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क बीड संभाजी नगर पोलिस स्टेशन परळी तहसीलदार साहेब परळी दिलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले आहे. मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सदरचे अनाधिकृत दुकान
Comments
Post a Comment