करोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र मेहनत घेणार्या पोलीस कर्मचार्यांचा परळी येथे सत्कार
परळी वै.(प्रतिनिधी) -: करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणार्या पोलीस कर्मचार्यांचा महाराष्ट्र सामाजिक लोकसेवाच्या वडर कॉलनी, सानीया नगर च्यावतीने परळी येथे सत्कार करण्यात आला.
गेल्या तीन महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर अहोरात्र ‘करोना योध्दा’ म्हणून सेवा देत आहेत. करोना महामारीमध्ये जनतेची अखंडपणे सेवा करणार्या पोलीस, आरोग्य कर्मचारी व इतर सर्वांचे महाराष्ट्र सामाजिक लोकसेवा वडर कॉलनी, सानीया नगरच्या वतीने हार्दिक आभार. याचाच एक भाग म्हणून करोना काळात जनतेला अहोरात्र सेवा देणार्या परळी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.आरती जाधव, ए.पी.आय.एकशिंगे, समुपदेशक सुनिता मॅडम आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नितीन पवार (उपाध्यक्ष, भाजप), आयुबभाई पठाण (जिल्हाध्यक्ष कामगार संघटना), करण कुसळे, अनिल पवार, रेहान पठाण, तालेब शेख, विकी मंजुळे, रोहन पवार, सुरज पवार, सुरज कुसळे यांच्यासह महाराष्ट्र सामाजिक लोकसेवा वडर कॉलनी, सानीया नगर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment