मौजे लिंबुटा येथे "सादग्राम "ची बैठक ; वृक्ष रोपांची लागवड करण्याचा निर्णय


परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे आज रविवार, दि.२६ जून रोजी सकाळी१०.वा.श्री हरीकृपा  सार्वजनिक वाचनालयात सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा या समितीची बैठक घेण्यात आली.
वृक्ष लागवड हा या बैठकीचा मुख्य विषय होता.
 स्मशान भूमित  तारेचे कंपाउंड किंवा वृक्ष संरक्षक जाळ्यांची व्यवस्था करणं शक्य होत असेल तर यावर्षी सुमारे २०० वृक्षारोपांची लागवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
तसेच पुढच्या रविवारी ग्रामस्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी अधिकाधिक सहभाग घेऊन   व कोरोनाशी संबधित शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करून ग्रामस्वच्छता करण्या संदर्भातही चर्चा करण्यात आली.
गतवर्षी ग्रामपंचायत व सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावर वड,पिंपळ, गुलमोहर,चिंच,आवळा,लिंब,करंज,अशी १००  वृक्षरोपांची लागवड करण्यात आली होती.त्यांचे आता जवळपास वृक्षात रूपांतर झाले आहे.
बैठकीस सरपंच सुदाम यशवंतराव मुंडे ,सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती सदस्य बळीराम सोमेश्वर मुंडे, ,सल्लागार रामदास  साहेबराव दिवटे(नाना),रमेश महारूद्र मुंडे,गोपाळ रामराव अघाव,समिती कार्याध्यक्ष विश्वनाथ ( आबा ) बंकटराव मुंडे,ज्ञानोबा बंकटराव मुंडे सर, प्रसिध्दी प्रमुख मनोज भरतराव मुंडे,नितीन भिमराव मुंडे , समिती संस्थापक अध्यक्ष व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेचे अशोक मुंडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर