बघा न.प.परळी आमच्या विभागातील रस्त्याची अवस्था
चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल
परळी (प्रतिनिधी-विकास वाघमारे) -: दोन-तीन दिवसापासून परळी शहरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातील भिमवाडी विभागात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे.
हा रस्ता मुख्य बाजारपेठांमध्ये जातो या रस्त्यावर असंख्य नागरिकांची रहदारी असते या रस्त्यावरून कुरेशी नगर, मिलिंद नगर, भिमा नगर, बरकत नगर यां नगरातील नागरिकांची रहदारी सुरू असते.
१६ मे रोजी या मार्गावरील भुयार नालीचे उद्घाटन झाले व या नगरातील रहिवाशांनी पावसाच्या तोंडावर काम चालू असल्यामुळे संबंधितांना प्रश्न विचारले की पावसामुळे येथे चिखल होईल मंग आम्ही वागायचं कसे तर काही संबंधितांनी काम पूर्ण झाल्यावर रोड चे काम पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
पण भुयार नाल्या ( ड्रेनेज) चे काम सुरू होऊन अंदाजे एक महिने पूर्ण झाला आहे. आईन पावसाळ्याच्या दिवसातच काही कारणास्तव हे काम बंद करण्यात आले आहे
यामुळे या मार्गावरील रस्त्यावर चिखल सासला असून नागरिकांना रस्त्यावरून जाताना चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल, हे बघत तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित अधिकाऱ्याने याकडे तातडीने लक्ष द्यावे. अशी मागणी भिमवाडी विभागातील नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया
सकाळी कामावर जाणाऱ्या तसेच घराकडे परतणाऱ्या पायपीट, बाइकस्वारांना चिखलातील रस्त्यांचा फटका बसतो. त्यामुळे पाय , बाइक घसरून पडण्याची अपघात होण्याचे भीती वाटत आहे. पावसाच्या पाण्याने चिखल सर्वत्र पसरल्याने या भागाला चिखलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
भागातील नागरिक
सचिन रोडे
Comments
Post a Comment