रुग्णवाहिका १०८,१०२ ड्रायव्हर कोरोना योद्धा. ड्रायव्हर राजू मुंडे यांच्या रूपात दिसला देव
परळी (प्रतिनिधी) -: संपूर्ण जगात आज कोरोनाने थैमान घातले असून भारतात व त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे.
या कोरोनाविषाणूच्या विरोधात अनेक जण आपले मोलाचे योगदान देत असून कोरोना विरुद्ध आपली लढाई लढत आहेत.
यात महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या १०८,१०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील ड्रायव्हर यांचेही मोलाचे योगदान कोरोनाविरुद्ध आहे.त्यांना फोन आला की तातडीने रुग्णवाहिका काढून संबंधित ठिकाणी जावे लागते व संबंधित रुग्ण अपघातातील पेशंट अशा अनेकांना वेळेवर दवाखान्यात पोहोचविण्याचे काम हे १०८,१०२ रुग्णवाहिका यावरील ड्रायव्हर अविरत करत असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा ड्रायव्हरची काय परिस्थिती आहे याविषयी जाणून घेण्यासाठी पत्रकार अनंत गित्ते यांनी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले १०८,१०२ रुग्णवाहिका ड्रायव्हर राजू वैजनाथ मुंडे यांची कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना परिस्थिती विचारली असता त्यांना त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या याबद्दल बरीच माहिती त्यांनी दिली. ड्रायव्हर राजू मुंडे म्हणाले की,कोरोनाची भीती समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना जशी आहे तशी आम्हालाही आहे.
परंतु आम्ही समाजाचे काही ऋण फेडण्याच्या उद्देशाने व आम्ही समाजाचे काही देणे लागतो या मानसिकतेतून रूग्ण सेवा करत असून आम्ही महाराष्ट्रातील १०८,१०२ नंबरचे सर्व ड्रायव्हर उशाला मोबाईल ठेवून वामकुक्षी घेत असून फोन आला की लगेच आम्ही रुग्ण स्थळी अपघातस्थळी पोहंचून रुग्णांना,अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहोचण्याचे काम करत आहोत.
ड्रायव्हर राजू वैजनाथ मुंडे यांना त्यांच्या वैयक्तिक समस्या विचारल्या असता त्यांनी सांगितले की मी रुग्णांची व पेशंटची काळजी घेऊनही गेल्या अनेक वर्षांपासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर ड्रायव्हर म्हणून काम करत असून मला आठ हजार रुपये इतके किरकोळ मानधन मिळते त्यात माझा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही.त्यात कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊनमुळे कुटुंबा पासून दूर राहावे लागत आहे. यातच महागाईमुळे ही आमची बिकट अवस्था झाली आहे. आम्हाला आरोग्य विभागाने काही सुरक्षा किट दिले असून त्या पुरेशा नाहीत.तेव्हा शासनाकडे आमची मागणी आहे की आम्हाला पुरेशा सुरक्षा किट देऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व १०८,१०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका वरील ड्रायव्हर यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत सामावून घ्यावे.
एकंदरीत राजू वैजनाथ मुंडे या १०८ व १०२ वरील ड्रायव्हर यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या योग्य वाटल्या व त्यांच्या मागण्यांची दखल महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक वाटते.
Comments
Post a Comment