अंधश्रध्दा निमुर्लन समिती परळीच्या वतीने शहिद जवानांना आभिवादन
परळी(प्रतिनिधी) -: भारत-चीन यांच्यातील अघोषित युध्दात भारताच्या 20 सैनिकांना वीर मरण प्राप्त झाले,त्या शहिद वीरांना अंधश्रध्दा निमुर्लन समिती,परळी शाखेच्या वतीने दि 21जुन रोजी,सांय.5:00 वाजता राणी लक्ष्मीबाई टाॅवर येथे भावपूर्ण आदराजंली अर्पण करण्यात आली.
या आभिवादन सभेच्या सुरुवातीला शहिदांच्या प्रतिमांना पूष्पहार आर्पण करण्यात आला व सर्व उयस्थितांनी पुष्प अर्पण केले.यानंतर वीर शहिद जवानांना पि.एस.घाडगे,प्रा.डि.जे.वाघमारे,आर. एच. व्हावळे,जी.एस.सौंदळे व प्रा.विलास रोडे यांनी आपल्या भाषणातुन आदराजंली आर्पण केली.
या आभिवादन सभेला परळीतील अंधश्रध्दा निमुर्लन समितिचे पदाधिकारी कोरोनाच्या पार्शवभुमीचा विचार करता शारिरिक आंतर ठेवुन हजर होते.याप्रसंगी परळी अंनिसचे कार्याध्यक्ष शौकत पठाण,प्रधान सचिव विकास वाघमारे,अशोक मुंडे,वैजनाथ कळसकर,सुकेशनी नाईकवाडे-राॅय, वैजनाथ गायकवाड,गोपाळ आघाव,रणवीर चक्रे,कपील तरकसे,संदीप मस्के,संदिप ताटे अदि उपस्थिती होती
Comments
Post a Comment