वटसाविञीपोर्णिमेच्या दिवशी स्ञियांना शतनुशतकांच्या गुलामगिरीतुन मुक्त करणाऱ्या क्रांतिज्योती साविञीमाई फुलेंच्या कार्याची आठवण करून शक्तिकुंज वसाहतीत केले प्रतिमा पुजन
वटसाविञीपोर्णिमेच्या दिवशी स्ञियांना शतनुशतकांच्या गुलामगिरीतुन मुक्त करणाऱ्या क्रांतिज्योती साविञीमाई फुलेंच्या कार्याची आठवण करून शक्तिकुंज वसाहतीत केले प्रतिमा पुजन
परळी (प्रतिनिधी)-:आज वटसाविञी पोर्णिमे दिवशी पुराण कथेतील सत्यवानाच्या साविञीचे स्मरण करून वडाला हळदीकुंकु, दुध,फळे वगैरे सामग्री वाहुन झाडाचे पुजन स्ञियाकडुन केले जाते. स्ञियांनी त्यांना अज्ञानाच्या गुलामगिरीतुन स्ञिजिवन मुक्त करणाऱ्या क्रांतिज्योती साविञीआई फुलेंच्या विचारांचे स्मरण केले पाहिजे.स्ञिमुक्ती दात्या आधुनिक साविञीचे स्मरण करणे याचीच स्ञीसशक्तीकरणासाठी खरी गरज असल्याचे सौ. मिनाक्षी सुनिल काळे यांनी सांगितले.
तसेच आज फक्त एकाच दिवशी वडाच्या झाडाचे किंवा फांदीचे पुजन न करता वृक्ष लागवड करायला हवी. वर्षभर झाडांना पाणी घालुन जतन केले तर पर्यावरणाचे संवर्धन होईल.असे आम्ही 2018 साली वटपोर्णिमेला लावलेली अनेक झाडे दोन वर्ष पाणी घालुन जतन केल्याने आज मोठी होऊन डोलत आहेत असेही मिनाक्षी काळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment