कोरोना योध्दा म्हणून फार्मसी संजय कराड सन्मानित


परळी वै. (प्रतिनिधी) :- येथील राधा मोहन प्रतिष्ठान,  दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्यावतीने
कोरोनाच्या महामारीत चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या स्वस्त औषधी सेवा जनरिक मेडिकल स्टोअर्सचे संचालक फार्मसी संजय उध्दवराव कराड यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
      जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. जगाला भेडसावणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स,पोलीस व सफाई कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असताना तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील मेडिकल स्टोअर्स फार्मसी यांचे ही यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. स्वस्त औषधी सेवा जनरिक मेडिकल स्टोअर्स , स्टेशन रोड परळी वैजनाथ या मेडिकल फार्मचे संचालक संजय कराड यांनीमागील तीन महिन्यापासून कोरोनाच्या लढाईत योगदान देत चोवीस तास रूग्णांना सेवा देऊन आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडली आहे.  कोरोना या जीवघेण्या संकटात ज्याप्रमाणे डॉक्टर,पोलिस यांची भुमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे  संकटाचा सामन्यात त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भुमीका व उत्कृष्ट कामगिरी महत्त्वाची आहे.याच कार्याची दखल घेत राधा मोहन प्रतिष्ठान,  दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी  व गती मल्टीसव्हीर्ससचे संचालक सचिन भांडे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले आहे. यावेळी अजय कराड, पत्रकार महादेव गित्ते, सुनील भोसले, हाडबे, चाटे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला