सोयाबीन बियाणे उगवले नाही त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या मनसे चे बीड जिल्ह्यातील केज,अंबाजोगाई, परळी येथे तहसिलदार यांना निवेदन
परळी (प्रतिनिधी) -: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले पण सोयाबीन चे बियाणे निकृष्ट असल्याने ते उगवलेच नाही,दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करून निकृष्ठ बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या कडे केज,अंबाजोगाई व परळी तहसीलदार यांच्या मार्फत मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,अंबाजोगाई तालुका अध्यक्ष श्रीराम सावंत,परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाल, सुनील जगताप,परळी शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर आदींस मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment