रेल्वे उड्डाण पुलाखाली पोलीस मदत केंद्राचे पो.नि.पवाराच्यां हस्ते उदघाटन


परळी(प्रतिनिधी)-: शहरातील रेल्वे उड्डाण पुलाखाली तालुका  पशु चिकिस्तक रूग्णालयाच्या बाजुस संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे आज रोजी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पो.नि.पवार यांनी  उदघाटन केले आहे.

परळी शहरातील रेल्वे उड्डाण पुलाखाली अनेक अवैद्यधंदे चालतात त्यातुन  अनेक वेळा गंभीर गुन्ह्यासह लहान,सहान गुन्हे
नेहमी घडत असतात या भागात पोलीस
चौकी म्हणजे पोलीस मदत केंद्र करावे अशी मागणी या भागातील नागरिंकानी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला केली होती
त्याची दखल पोलीस अधिक्षक यांनी घेवुन तसे आदेश दिल्यावर संभाजीनगरचे
पो.नि.पवार यांनी आज रविवार रोजी या भागात तालुका पशुचिकिस्तक रूग्णालयाच्या बाजुस पोलीस मदत केंद्राचे उदघाटन केले या वेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक एकशिंगे,पो.उप.नि.मरळ,आईटवार,
भताने ,दत्ता गिते व या वार्डातील नगर सेविकेचे चिरंजिव केशव गायकवाड उपस्थित होते.सदर पोलीस मदत केंद्रात    पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार पोलीस कार्यरत राहणार असुन रात्रीच्या वेळी विशेष गस्त राहणार असे पो.नि.पवार यांनी सांगीतले असुन या पोलीस मदत केंद्रामुळे अवैद्यधंदे व त्यातुन होणाऱ्या इतर गुन्ह्यावर वचक निर्माण होईल असा विश्वास पो.नि.पवार
यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला