डाॕ.शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावरील त्वरित खड्डे बुजवा;अन्यथा आंदोलन-रोहित (आबा)मुंडे, नितीन मुंडे
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी शहरातील डॉ शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर शेकडो खड्यांनी खड्डेयुक्त झाला आहे.हा पुल प्रवासाठी जिवघेणा झाले आहे.पुलाचे हे खड्डे त्वरित बुजवुन प्रवाश्याना दिलासा द्या अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा रोहित मुंडे व नितीन मुंडे यांनी दिला आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या वतिने आज सार्वजनिक बांधकाम विभागच्या उपविभागीय अभियंता यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उडाण पुला वरिल शेकडो खड्डे प्रवाशांच्या रहदारीसाठी प्रचंड अडथळा ठरत आहेत.या खड्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत.या पुलावरुन दैनंदिन हजारो वाहनाची ये-जा होत असते.याच मार्गाने शाळकरी मुलांच्या स्कुल बस थावत असतात.पुलावरील खड्डे चुकवण्याच्या नादात मोठा अपघात आणी जिवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संबधीत बांधकाम विभागाणी त्वरित लक्ष देऊन हा पुलावरील रस्त्यातील खड्डे बुजवावे अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा रोहित मुंडे व नितीन मुंडे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment