टिक टॉक वर असभ्य भाषेत व्हिडिओ करणाऱ्या मुलास केले माफ
परळी (प्रतिनिधी) -: गेले तीन दिवस टिक टॉक वर एका मुलाने असभ्य भाषेत वंचित बहुजन आघाडी च्या संदर्भात टीका केली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भर त्याचे तीव्र पडसाद उमटले कारण त्याने वापरलेली भाषा अतिशय खालच्या पातळीची होती. म्हणूनच
वंचित बहुजन आघाडी परळी येथील पदाधिकारी यांनी प्रचंड संघर्ष करत गुन्हा दाखल केला तर बीड, गेवराई, केज, वडवणी, पाटोदा,माजलगाव, अंबेजोगाई, येथील पदाधिकारी यांनी पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली,
आणि अचानक त्या मुलाची आई विडिओ च्या माध्यमातून समोर आली आणि म्हणाली की श्रध्देय बाळासाहेबांनी माझ्या मुलाला मोठ्या मनाने माफ करावे आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी माझ्या मुलाला माफ केले असते, त्याला वडील नाहीत मी एकटी आहे. अशी विनंती करणारा विडिओ पोस्ट केला.
तो विडिओ श्रध्देय बाळासाहेबांच्या पर्यंत पोहचला आणि त्यांनी तात्काळ सुजत आंबेडकर यांना सर्व तक्रारी माघे घेऊन मोठ्या मनाने त्या मुलाला माफ करा असे सांगितले. शेवटी विश्वरत्नाचे रक्त आहे आमच्या साहेबांमधे एवढ्या मोठ्या मनाने माफ करायला सुधा विशाल मन लागते ते साहेबांकडे आणि सुजत कड़े आहे.
सुजताभाई चा सकाळी call आला आणि त्या मुलाला माफ करा आपण तक्रार माघे घ्या असा आदेश दिला.
परळी येथील कार्यकर्ते संजय गवळी, गौतम साळवे, प्रसंजीत रोडे, राजेश सरोदे,भावेश कांबळे, गौतम आदमाने, अदि कार्यकर्त्यांची टीम ने परळी पोलिस स्टेशनला जाऊन त्या मुलाच्या आईची भेट घेऊन. तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले की “ताई तुमचा विडिओ श्रध्देय बाळासाहेब व सुजतभाई पर्यंत गेला असून त्यांनी तुमच्या मुलाला मोठ्या मनाने माफ केले आहे. यापुढे तो अशी काही चूक करणार नाही याची काळजी घ्या”
मी श्रध्देय साहेबांची आयुष्यभर आभारी राहील व मला इथून पुढे साहेबांनी कुठला ही आदेश द्यावा मी पाळणार असे त्या मुलाच्या आईने सांगितले.
Comments
Post a Comment