मातोश्री ऑफसेटचे संचालक श्री विठ्ठलराव साबळे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधव, अ.भा.वारकरी मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- मातोश्री ऑफसेट चे संचालक श्री विठ्ठलराव साबळे यांचा वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.7) पत्रकार बांधव, अ.भा.वारकरी मंडळ व मित्र परिवाराच्या पुष्पहार घालून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
मातोश्री ऑफसेट येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक व पत्रकार रामप्रसाद गरड, प्रकाश सूर्यकर, मोहन व्हावळे, आत्मलिंग शेटे, धिरज जंगले, संतोष जुजगर, महादेव गित्ते, बालाजी ढगे यांच्यासह रामेश्वर साबळे, शैलेस सोळंके, दत्ता शिवगण, सचिन नखाते, बाळासाहेब लोभे, संतोष वळसे, शिवराज सोनटक्के, सुरज ठाकूर, प्रताप पुरभये, विशाल नरवणे, सोमनाथ गित्ते आदी मित्र परिवार उपस्थित होता.
Comments
Post a Comment