होलेर समाजाच्या ग्रा.प.सदस्यास मारहाण, आठ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व अन्य गुन्हा दाखल
परळी (प्रतिनिधी ) गावात आलेले लाईटचे पोल पहाण्यासाठी गेलेल्या होलेर समाजातील ग्रामपंचायत सदस्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना परळी तालुक्यातील नागदरा येथे घडली असून परळी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरुद्ध अॅटरसिटी अॅकट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नागदरा येथील होलेर समाजाचे ग्रामपंचायत सदस्य माणिक वैजनाथ ब्रींगणे गावातील गांधीनगर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आलेले लाईटचे पोल बघण्यासाठी भाऊ पिराजी सोबत गेले असताना गोविंद रामराव केंद्रे याने जातीवाचक शिवीगाळ करून लय माजलास असे म्हणत मारहाण केली.
यानंतर ते घरी गेल्यावर तिथे जाऊन घराच्या बाहेर काढून त्यास दगड, काठ्या, लाथा बुकयानी मारहाण करण्यात आली. कंबरेत व हातावर दगड घालून त्याना जखमी करण्यात आले. गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठ नेते सुभाष वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय गवळी, गौतम साळवे, सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे, पञकार विकास वाघमारे आदी पोहोचल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
माणिक ब्रींगणे याच्या फिर्यादी वरून गोविंद रामराव केंद्रे, जनार्दन दत्ता केंद्रे, सूर्यकांत प्रसाद नागरगोजे, सुधाकर माणिक नागरगोजे, राहुल सुधाकर नागरगोजे, कैलास दत्ता केंद्रे, भारतबाई रामराव केंद्रे, सुवर्णा गोविंद केंद्रे सर्व रा. नागदरा यांच्या विरुध्द कलम 324, 452, 143, 147, 149, 323, 504, 506, अ. जा. जमाती प्रतिबंधक अॅकट 3 (1)r. 3 (1)s. 3 (2) 3 (v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस हे करीत आहेत.
Comments
Post a Comment