दैनिक सूर्योदय चे कार्यकारी संपादक भागवत वैद्य यांना जीवे मारण्याची धमकी
बीड (प्रतिनिधी) शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दैनिक सूर्योदय चे कार्यकारी संपादक भागवत वैद्य हे ऑफिशियल कामकाज आटोपून घराकडे निघाले व भक्ती कंट्रक्शन रोडने जात असताना,करपरा नदीच्या जवळ एका अज्ञात झोपडपट्टी गुंडाने आमच्या विरोधात बोलतो व बातम्या छापतो असे म्हणून तुला जिवंत मारू. आमच्या नादाला लागू नको.अशी धमकी देऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. रात्री त्याने तोंड गुंडाळलेले होते. होंडा कंपनीची स्कुटी विना नंबरची त्याच्या जवळ होती. तो कोण होता. हे समजु शकले नाही. जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला. या घटनेची तक्रार भागवत वैद्य यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीवर भादवि नुसार 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल जायभाये हे करीत आहेत .
चौकट
लेखणीची धार कमी करू नये
दैनिक सूर्योदय च्या माध्यमातून अनेक नवीन विषयांना पत्रकार भागवत वैद्य यांनी वाचा फोडली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याने त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला आहे. पत्रकार भागवत वैद्य यांना आर पी.आय.( ए) गटाचे बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांचा व वैयक्तिक आणि पक्षाच्या वतीने पूर्ण ताकतीने पाठिंबा असेल आणि सोबतही असो अशा धमक्यांना बिलकुल घाबरून जाऊ नये .
किशोर कागदे बीड जिल्हाध्यक्ष आरपीआय( ए)
चौकट
संरक्षण व बंदुकीचे लायसन पाहिजे
मी भागवत वैद्य दैनिक सूर्योदय च्या माध्यमातुन गोरगरिबांच्या समस्या, अडचणी, प्रश्न, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सरकारकडे मांडल्या भले कुणाच्या विरोधात वाटत असेल परंतु जाणीवपूर्वक विरोधात छापत नाहीत. बातम्यांच्या माध्यमातून येणाऱ्या धमक्यांना भागवत वैद्य घाबरत नाही. मला पोलीस संरक्षण हवे त्याचबरोबर बंदुकीचा परवानाही मिळावा. यासाठी रीतसर पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करणार आहे.
Comments
Post a Comment