परळी तालुक्यातील नागदरा येथे न उगवलेल्या सोयबीनच्या बियाण्याचे कृषी विभागच्या वतीने पंचनामा


परळी वै.( प्रतिनिधी) :-  जुन महिन्याच्या सुमारास पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी सुरुवात केली. परंतु पेरलेले सोयबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. आज नागदरा शिवारात कृषी विभागाच्या वतीने न उगवलेल्या सोयबिनचे स्पाँट पाहणी करून पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शेतकरी सोपान मुंडे यांच्या शेतात पाहणी करतांना गेवराई येथील कुषी आधिकारी मुंडे, कुषी सहायक सांगळे, पैठनकर यांनी शेतकरयाचा बाधावर जाऊन पंचनामा केला यावेळी शेतकरी उपस्थित होते. 
     खरीप हंगामात मृग नक्षत्राच्या सुरवातीला परळी तालुक्यात  समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. मागच्या वर्षी पाऊसाने सोयाबिन खराब झाल्या मुळे तो पेरणीस योग्य नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारातून चांगल्या कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. परंतु सोयबिनचे बियाणे उगवलेच नाही परळी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचे 90 टक्के बियाणे उगवलेच नाही. तालुक्यातील नागदरा येथील शेतकऱ्यांनाही सोयबिन न उगवलेल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात शेतात येऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली.  कृषी विक्रेत्याकडून घेतलेल्या विविध कंपन्यांचे  बियाणे उगवलेच नाही. परळी मतदार  संघातील अनेक गांवातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन  बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी सोपान मुंडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर