परळीत उड्डाण पुलावर अपघाती एक चा मृत्यू तर एक जंखमी



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- येथील उड्डाण पुलावर काही वेळापूर्वी झालेल्या मोटारसायकल आणि ट्रक अपघातात २२ वर्षीय शेख कस्मी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला शिवाजी सुरवसे हे  जंखमी झाला असून त्याच्यावर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना आज दि.07 जुन रोजी सायंकाळीच्या सुमारास घडली आहे. 
       येथील उड्डाण पुलावर मोटारसायकल आणि ट्रक यांचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शेख कस्मी वय अंदाजे २२ वर्ष रा. लिंबगाव -बर्दापूर ता.अंबाजोगाई व त्याचा नातेवाईक मोटारसायकल (MH. 44.7496) वरून जात असताना समोरून आलेल्या ट्रकची (MH. 44.U.9686) समोरासमोर धडक झाली. असता या अपघातात मोटारसायकल वरील चालक शेख कस्मी याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला शिवाजी प्रभाकर सुरवसे मात्र जखमी झाला असून त्याच्यावर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक स्वतः ड्रायवरने संभाजीनगर पोलीस ठाणे परळी वैद्यनाथ येथे घेऊन हजर झाला आहे. ड्रॉयव्हरच्या सांगण्यावरून मोटारसायकल स्लीप होऊन ट्रकला धडकली तर जखमी युवकाकडून मात्र ट्रकनेच धडक दिली असे सांगत असले तरी सत्य प्रकार काय हे पोलिसांच्या तपासनंतरच निष्पन्न होईल. दरम्यान मयत हा परळी येथील पेठ मोहल्ला भागातील रहिवासी असलेल्यांचा जावई असून सासरवाडीत आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला