राजकीय पक्षाचा केला अश्लील टिकटॉक ;परळीत तीन तास नंतर तरुणावर गुन्हा



परळी वै.(प्रतिनिधी) :- एका राजकिय पक्षाबद्दल अपशब्द वापरुन टिकटॉक व्हिडीओ केल्याप्रकरणी एका तरुणावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात समोर तीन तास ठिया आदोलन नंतर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     वैभव केशव मुंडे (रा.टोकवाडी, ता.परळी) असे आरोपीचे नाव आहे. गौतम सुधाकर साळवे हे वंचित बहुजन
आघाडीचे परळी तालुका महासचिव आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव मुंडे याने वंचित बहुजन आघाडी या पक्षाबद्दल अपशब्द वापरुन माझी व पक्षाचा मानसन्मान व प्रतिष्ठेला धक्का बसेल तसेच एखाद्या स्त्रीला लज्जा वाटेल असा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. म्हणून या प्रकरणी वैभव मुंडेवर परळी ग्रामीण पोलीसात कलम 180/2020 कलम 294, 509 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आरोपी अटक केलेला नाही   आहे. पुढील तपास पोना.केकान करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला