परळी तहसिलदार यांनी काढलेले आदेश तात्काळ रद्द करावेत.- पी.एस.घाडगे
परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कन्टनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भिमनगर व जगतकर गल्ली या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना/कुटुंबाना दररोज लागणा-या जिवनावश्यक व इतर आवश्यक वस्तूची माहिती घेणे व त्या त्यांना घरपोच पुरवठा करण्यात याव्यात या करिता शिक्षकांना या कामी नियुक्त्या दिलेल्या आहेत. अशी अवेहलना करणारी कामे देऊन शिक्षकांची विद्यार्थी व समाजामध्ये आसलेली प्रतिष्ठा,सन्मान कमी करणारी आहेत.त्यामुळे शिक्षकांच्या मध्ये मध्ये मोठा असंतोष/नाराजी निर्माण झाली आहे. शिक्षकांचा अशा आपत्तीच्या काळात कामांना विरोध नाही.त्यांना कामे त्यांच्या योग्यजतेनुसारच दिली जावीत अशी मागणी आहे. त्यांची अवेहलना करणारी कामे देऊ नयेत अशी मागणी आहे.
या आगोदर अशीच कामे पाटोदा व बीड येथे देण्यात आली होती.त्यास मराठवाडा शिक्षक संघ व इतर शिक्षक संघटनांनी कडाडून तिव्र विरोध केला होता. या विरोधातील भावना लक्षात घेऊन तेथील संबंधीतांनी हि शिक्षकांना दिलेली कामे रद्द केली होती. परंतु परळीच्या तहसीलदार साहेबांनी यातून बोध न घेता शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी व त्यांची अवहेलना करणारीच कामे दिली आहेत. तो आदेश त्यांनी तात्काळ परत घ्यावा व शिक्षकाप्रती आदर दाखवावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे,सरचिटणीस व्हि.जी.पवार,जिल्हाध्यक्ष डि.जी.तांदळे, सचिव राजकुमार कदम,ता.अध्यक्ष के.आर.कसबे, सचिव बंडू अघाव, शहराध्यक्ष राजकुमार लाहोटी,सचिव राजेश साखरे, महादेव धायगुडे, परवेझ देशमुख,आलिशान काजी,अविनाश लोणीकर,बंडू चव्हाण,श्रीहरी दहिफळे, ज्ञानोबा गडदे, अनंत मुंडे आदिनी प्रसिद्धी पत्रकाद्वरे परळीचे तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment