विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करा मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी



परळी (प्रतिनिधी) -: सद्या राज्यभर कोरोना प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहे. कित्येक लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत तर बरेच जण आर्थिक संकटात सापडले आहेत.  यात आपल्या पाल्यांचे प्रवेश शाळेत कसे घ्यायचे असा प्रश्न  पालकासमोर उभा राहीला आहे.

 विद्यार्थी व पालकांच्या या अडचणी लक्षात घेता येथील मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीस या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी  उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावी अशी मागणी केली. 
शहरातील सर्व विनाअनुदानित शाळेने वर्ग पहीली ते  दहावी पर्यंतची या शैक्षणिक वर्षांची शुल्क माफ करण्यात यावी. तसेच अकरावी व बारावीच्या प्रथम सत्राची शैक्षणिक शुल्क ही माफ करावी. या शैक्षणिक फीची शासनाने शाळांना भरपाई द्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या  रक्कमेत वाढ करावी. अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळेस मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसचे शहराध्यक्ष सय्यद जाफर, सय्यद सबाहत अली, शेख फरहतुद्दीन, शेख मुदस्सिर,  सय्यद मुबशिर या सदस्यांचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला