बीड जिल्हा : दोन पॉझिटीव्ह; धारुर, गेवराईला पुन्हा धक्का
बीड (प्रतिनिधी)-: जिल्ह्यातून तपासणीस पाठविण्यात आलेल्या 23 स्वॅबपैकी आतापर्यंत 12 अहवाल हाती आले आहेत. त्यापैकी धारुर व गेवराई तालुक्यातील दोघे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे.
धारुर तालुक्यातील रुग्णाचे वय 10 वर्षे असून गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील रुग्ण 18 वर्षीय मुलगी आहे. त्या मुलीस प्रवासाचा इतिहास असून ठाणे येथून आलेली आहे. दरम्यान, आणखी 11 अहवाल येणे बाकी आहे.
धारुरच्या 11 वर्षीय मुलास बाधा
धारुर : तालुक्यातील आंबेवडगाव येथे एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आज आणखी एका 11 वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली आहे. आंबेवडगाव येथे मुंबई येथून आलेल्या 65 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झालेली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच व्यक्तीच्या दोन सुना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. आज परत त्याच कुटुंबातील 11 वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. रविवारी दोन अहवालांचा कोणताही निष्कर्ष प्राप्त होऊ शकला नसल्याने ते स्वॅब परत घेतले होते. त्यातील एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment