महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन


बीड,(प्रतिनिधी) दि.२४:- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९अंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील संगणकीय पावतीमध्ये "आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार  तहसिलदारकडे वर्ग करण्यात आली
आहे" असा शेरा नमूद असलेल्या अशा शेतक-यांनी त्यांचे आधार कार्ड,बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र इत्यादीसह संबंधित तहसिलदार यांच्याकडील तालुकास्तरीय समितीकडे हजर होऊन आपल्या ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन शिवाजी बढे,  जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.

 यानंतर पात्र लाभार्थ्यांची रक्कम त्यांचे खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.

यासाठी  तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त असलेल्या  तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयास ऑनलाईन उपलब्ध असून सदरील यादया संबंधित तहसिल कार्यालय, सहायक निबंधक,सहकारी संस्था कार्यालय व संबंधित बॅंक शाखेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहेत.

शासनाचे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पोर्टलवर ज्या शेतक-यांची नावे  पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नमूद आहेत. त्यांना आधार प्रमाणीकरण करणेसाठीची सुविधा
१७ जून २०२० पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 यादीमधील नाव असलेल्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही करताना ऑनलाईन पद्धतीने निर्गमित झालेल्या तक्रारींचे निराकरण जिल्हास्तरीस व तालुकास्तरीय समिती मार्फत करण्यात येत असून सदयःस्थितीत तालुकास्तरावर १५७१ ऑनलाईन तक्रारी प्राप्त असून त्यापैकी ५१५ निकाली काढलेल्या आहेत व १०५६ एवढया तक्रारी प्रलंबित आहेत.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर